स्मार्ट तंत्रज्ञान आणि परवडणाऱ्या फेस्टिव्ह ऑफरसोबत करा तुमचं घर अपग्रेड

पुणे / शबनम न्युज

सध्याच्या कोरोना महामारीच्या कालात संपूर्ण भारताला घरातच राहून सण साजरेकरायला लागत आहेत आणि त्यामुळे ग्राहाकांची वागण्याची पद्धतही बदलली आहे. सगळेच वर्क फ्रॉम होम करत आहेत. कोरोना साथीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरातील कामगार मंडळीही सुटीवर आहेत. त्यामुळे ऑफिसचं काम आणि घरकाम दोन्हीमुळे सगळे वैतागलेत. पण तुमची काळजी घेणारी इक्वेटर कंपनी खास आपल्यासाठी घेऊन आली आहे एक असं वॉशिंग मशीन जे तुमचे कष्ट कमी करेल. अमेरिकेतील आघाडीच्या घरगुती उपकरणांच्या इक्वेटर अडव्हान्स अप्लायसन्सेस या ब्रँडनी आपल्या स्मार्ट वॉशिंग मशीन Super Combo EZ 5000 CV या मॉडेलवर वन टाइम फेस्टिव्ह ऑफरअतंर्गत ग्राहकांसाठी 33 टक्क्यांची सूट दिली
आहे. या मशीनचं वैशिष्ट्य असं की यात कपडे तर स्वच्छ निघतातच पण ते मशीनमध्येच 100 टक्के वाळवले
जातात. त्यामुळे कपडे पिळा, वाळत टाका या सगळ्या त्रासातून तुमची सुटका होईल.

या स्मार्ट मशीनची आणखीही बरीच वैशिष्ट्य आहेत. हे मशीन विजेची आणि पाण्याची 20 टक्के बचत करतं
त्यामुळे ते पर्यावरणपूरकही आहे. हवामान बदलामुळे पर्यावरणाची काळजी घेणं किती महत्त्वाचं झालं आहे हे
आपण जाणतोच. आपल्याला प्रत्यक्ष त्यासाठी काही करता आला नाही तरीही आपण पर्यावरणपूरक वस्तू
वापरून आपली जबाबदारी पार पाडू शकतो. कपड्यांना धुळीपासून व इतर संसर्गजन्य घटकांपासून सुरक्षित
ठेवणारी अनेक वैशिष्ट्य या मशीनमध्ये आहेत. या मशीनमध्येच सॅनिटायझर सायकलची व्यवस्था आहे ज्यामुळे
पाण्याचं तापमान 74 अंश सेल्सियसपर्यंत वाढवून जंतूंचा नाश केला जातो. अँटि-मायक्रोबायल ट्रिटमेंट
टेक्नॉलॉजीमुळे कपडे सुरक्षित राहतातच पण जीवाणूंची वाढ रोखली जाते. स्मार्ट वॉशिंग मशीन Super
Combo EZ 5000 CV हे मॉडेल कंपनीच्या वेबसाइटवर आणि अमेझॉन व फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स
वेबसाइट्सवरही उपलब्ध आहे. एक महिनाभर चालणारी ही ऑफर दिवाळीपर्यंत म्हणजे 14 नोव्हेंबर 2020
पर्यंत सुरू राहील.

दिवाळी आणि आगामी लग्नाच्या मोसमात कंपनीने ग्राहकांसाठी इंट्रिग्रेटेड एकमेव असं साडी वॉश सायकल हे
उपकरण आणलं आहे जे वापरून तुमचे महागडे कपडे तुम्ही व्यवस्थित ठेवू शकाल. सद्यस्थितीत सोशल
डिस्टंन्सिगचे नियम पाळून या उत्सवांचा उत्साह कायम राखणंही गरजेचं आहे.

या महिनाभर चालणाऱ्या फेस्टिव्ह ऑफरबद्दल इक्वेटर अडव्हान्स अप्लायन्सेसचे संस्थापक आणि सीईओ अतुल
वीर म्हणाले, ‘ भारतीय बाजारपेठेत आम्ही आताच दाखल झालो आहोत त्यामुळे आम्ही सध्याच्या स्मार्ट आणि
टेक सॅव्ही ग्राहकांचा कपडे लाँड्रीला टाकण्याची सेवा कमी त्रासदायक आणि त्यांना परवडणाऱ्या किमतीत दे
ण्याचा प्रयत्न करत आहोत. कंपीनीची ही भारतातील पहिलीच दिवाळी आहे त्यामुळे आम्ही सणासुदीचा
उत्साह जागता ठेवण्यासाठी ही आकर्षक स्कीम सादर केली आहे. यामुळे ग्राहकांना घरातच राहून सुरक्षितपणे
दिवाळी साजरी करता येईल.’

ते पुढे म्हणाले, ‘ भारतातील निमशहरी आणि ग्रामीण भागातसुद्धा तंत्रज्ञानाचा स्वीकार केला जात असल्याने
या सर्व भागांतून आमच्या उपकरणांना मागणी वाढेल असा आमचा विश्वास आहे. टायर 1 आणि टायर 2
शहरांतल्या स्थानिक पार्टनरशी धोरणात्मक भागीदारी करून एक दणकट सप्लाय चेन उभी करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. सप्लाय चेनच्या माध्यामातून गतिमान आणि कार्यक्षम असं वितरण जाळं उभं करायचा कंपनीचा मनोदय आहे.’